Resistance आणि support म्हणजे काय ?

आज आपण Support (थांबा) आणि resistance (प्रतिकार) हा मुद्दा बघणार आहोत जो मार्केट मध्ये उपयोगी आहे ज्याचा मार्केट मध्ये आपल्याला दररोज उपयोग होतो.

Support (थांबा)
Support म्हणजे काय तर एखादया कंपनीचा स्टॉक हा एखादया किंमतीच्या जवळ येतो आणि पुन्हा वरती वापस जातो असे तो २ ते ३ वेळा जेव्हा त्या किमतीच्या आस पास येतो आणि वरती जातो त्याला आपान support असे म्हणतो.

Resistance (प्रतिकार)
Resistance म्हणजे काय तर एखादा कंपनीचा स्टॉक हा २ ते ३ वेळे पेक्षा त्या किमतीला येतो आणि तिथून पुन्हा खाली पडतो किवा खाली जातो याला resistance आसे म्हणतो आपण चित्रा मध्ये पाहू शकतो.

आपण बघु शकतो की BEL या कंपनीचा चार्ट मध्ये कसा resistance आणि support काम करत आहे जिथे जिथे लाल खूण केली आहे त्या किमतीला price ६४.८५ ला येऊन पुन्हा वापस गेली आहे आपण याला support असे म्हणतो आणि जे पिवळ खूण केली आहे त्याला आपण resistance असे म्हणतो. जेव्हा तिसऱ्या वेळी resistance ने किमतीला तोडला आहे त्याला आपण breakout point असे म्हणतो याच प्रकारे downside la पण breakout होऊ शकतो.